
ढिंग टांग
दिवेलागणीचा प्रहर उलटताना
पावलांची चाहूल लागली, पाठोपाठ
दर्वळला कस्तुरीचा मंद गंध, ज्यात
मिसळला होता रक्त, स्वेद
आणि अश्रूंचाही दर्प.
काळोखाच्या घनगर्द सावल्यांनी
घेरलेल्या प्रासादात एकुटवाण्या
बसलेल्या गांधारीनेही टवकारले कान
कस्तुरीचा गंध येताच तिच्या मस्तकात
गेली तिडीक, आणि दुर्गंधाचा भपकारा
आल्याप्रमाणे तिने वळवली मान.
तिरस्कारांनी ओतप्रोत भरलेल्या सुरात
ती म्हणाली, ‘‘ झालं का तुझं समाधान?
भागली भूक? बधीर झाला नसशील,
तर ऐक ते लक्ष लक्ष विधवांचे प्रलाप,