ढिंग टांग : जंग-ए-शायरी!

वझीरे-आजम-ए- हिंदोस्तां और हमारे हमराह जनाब नमोजीसाहब को बंदानवाज शाहबाझ शरीफ का सलाम. खूब दिवस झाले इस्तकबाल केला नव्हता.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

वझीरे-आजम-ए- हिंदोस्तां और हमारे हमराह जनाब नमोजीसाहब को बंदानवाज शाहबाझ शरीफ का सलाम. खूब दिवस झाले इस्तकबाल केला नव्हता.

जिंदगी हर कदम इक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है

(फिल्म : मेरी जंग, फनकार : मैं!)

वझीरे-आजम-ए- हिंदोस्तां और हमारे हमराह जनाब नमोजीसाहब को बंदानवाज शाहबाझ शरीफ का सलाम. खूब दिवस झाले इस्तकबाल केला नव्हता. ख्याली-औ- खुशहाली पूछली नव्हती. आखिर काल रोज एक कागज मिल गया, म्हणून हे खत लिखत आहे. कलम (याने की बॉलपेन) सुध्दा चीनकडून उसनवारीने आणले असून वापरल्यावर दोन दिन के बाद लौटवीन! रहने दो.(याने की असो!)

जनाब नमोजीसाहब, आपण दोघेही ठहरलो पडोसी! आपल्या दोन्ही मुल्कांची सालगिरहसुध्दा अलबत्ता एकच आहे. ज्यांचा होरोस्कोप सेम टु सेम आहे, अशा दोघांमध्ये दुश्मनी क्या काम की? लेकिन कभी वहां से विरजण-ए-दही यहां नहीं आ सका, और ना यहां का पाया-इ-गोश्त वहां जा सका! हालही में आप के यहां संक्रांत नावाचा एक पवित्र दिवस येऊन गेला. या दिवशी तुमच्याकडे तीलगुल नावाची मिठाई देऊन ‘मीठी बात करो’ असे पडोसीलोकांना सांगितले जाते, असे सुनण्यात आले. सच है क्या? तुमचा तीलगुल आमच्या गरीबखान्यात धाडला असता तर फार बरे झाले असते, जनाब! खैर, मीच पहल करुन आता तुम्हाला वडी-ए- तील-ओ-गुल द्यायला येणार आहे. अर्ज किया है-

गुलशन हो गया वीराँ, क्या है आरजू-ए- बुलबुल,

कौन देगा हमें, हाथों में कभी वो तील-ओ-गुल?

कसा आहे शेर? आँ आँ आँ! द्या ताली!! शुक्रिया!! बाकी, आमच्या मुल्कातील हालत सध्या आपण जानत असालच. कोविडने हालत बेकार केली, बाद में युक्रेनची जंग शुरु झाली. बाकी कुछ बचा तो मेहंगाई मार गई. अर्ज किया है-

बेचैन दिल को सवाल है के क्या खाएंगे आज पांचसो रुपये टमाटर, औ चारसों का हुआ प्याज

…हल्ली मला खूप (जोरात) शेरोशायरी होऊ लागली आहे. वझीरेआजम झाल्यापासून वेळच वेळ असतो. सबब, ही शायरी! रहने दो! मुद्दा- इ- सांगणे (याने की : सांगण्याचा मुद्दा) इतकाच की आपल्या दोन्ही मुल्कात आजतलक तीन बार जंग झाली. पैंसठ, इकहत्तर और निन्यानबे! पाक अवाममधली एकही शख्स ही तिन्ही वर्षे कधीही भुलू (याने की विसरु) शकणार नाही. तिन्ही वेळा आम्हाला बरेच युनानी, जालीम इलाज करुन घ्यावे लागले! रीढ की हड्डी अजूनही पेच ढिला झाल्यासारखी कुरकुरते. आणखीही बरीच मोडतोड झाली. अब तो हालात ऐसे है की, रोटी के वास्ते आटा नाही, बिर्याणी के वास्ते चावल नाही, तंदूर के वास्ते मुर्गी नाही, आणि दातावर मारायला पैसा नाही! जंगमुळे दवापाण्यातच पैसा जातो, हे आमच्या लक्षात आले आहे.

‘हाल कैसा है जनाब का? क्या खयाल है आपका? तुम तो फिसल गये खो खो खो, यूं ही मचल गए आ आ आऽऽ…’ हे युगुलगीत आपल्या दोघांचेच आहे, अशी सध्या हालत-ए-पाक झाली आहे. कुछ करो, जनाब! कुछ भी करो, लेकिन हमारे साथ जंग मत छेडो! वरना-

सरजमीं- ए- पाक का, क्या बचें फालुदा-ए-इज्जत

मत कर गुमाँ तिरे विकासपर, ऐ पडोसी, लूट लज्जत!

रहने दो! शुक्रिया. बचेंगे तो मिलेंगे. (शायरी भी पढेंगे! ) आपका अपना, शाहबाझ (शरीफ) लाहौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com