esakal | ढिंग टांग : शीजी, नमोजी आणि पबजी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : शीजी, नमोजी आणि पबजी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमोजी : (वाजणारा फोन संशयाने उचलत) जे श्री क्रष्ण! कोण वात करे छे?

शीजी : (डोळे मिटून) नी हाऽऽव!!

नमोजी : (गडबडून) मी इथेच हाव! तुम्ही कोण हाव?

शीजी : (डोळे मिटूनच कंटिन्यू...) बाव की... बाव की! जाव शान हाव! नी हाव मां?

नमोजी : (दांतोंतले उंगलियां...) च्या मारी! ही काय भानगड?

शीजी : (उत्कंठा अधिक न ताणता)...मी शी बोलतोय!

नमोजी : (हातातला फोन सांभाळत) मिशी? कोणाची मिशी?

शीजी : (चिमटीत माशी पकडल्याप्रमाणे) मी... म्हंजे मी बोलतोय, आय... शी शी!!

नमोजी : (नाक वेंगाडून) शी:!!

शीजी : (मांडारिनमधून थेट मांडव्यात शिरत...) अरे नमोभाई, हूं तमारा मित्र शी जिनपिंग वात करुं छुं...बीजिंगथी!! तमारा चायनीज फ्रेंड! याद छे ने! झूला? नारियेल पानी? ढोकळो? फाफडो?

नमोजी : (डोकं खाजवत) कछु याद नथी आवतो!

शीजी : (एक डेडली पॉज घेत) गलवान?

नमोजी : (अचानक उजेड पडत ) आँ? शी जिनपिंग वात करे छे? (खोट्या अघळपघळपणाने) हां, हां! अरे, आ तो कम्माल थई गई! केम छो, शीभाई! बध्दा ठीकठाक तो छे ने?

शीजी : (प्रतीकात्मक पध्दतीने डोळा मिचकावत) एकदम चोक्कस! धंदापाणी एकदम सरस!

नमोजी : (कावेबाजपणाने) सरस! जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोतो खाय! धंदापाणी करायच्या तो, चायनीजजेवा!...शीभाई, प्रत्यक्ष भेटला असता तर मिठी मारली असती मी!

शीजी : (दुप्पट कावेबाजपणाने) म्हणूनच फोन केला!

नमोजी : (खोटी स्तुती करत) आम्ही तो तुमच्या बध्दा चायनीज आयटेम बेन करुन टाकला! तरी पण तमारो धंदो जोरशोरथी च्यालू छे! कमाल छे, शीभाई! मानना तो पडेगा!!

शीजी : (कृतज्ञतेने खाली लवत) थेंक्यू केहवामाटेज फोन किधा!! क्शी क्शी!!

नमोजी : सर्दी झ्याला काय? शिंकते कशाला?

शीजी : क्शी क्शी म्हंजे चिनी भाषेत थँक्यू!

नमोजी : (गोंधळून) थेंक्यू कशाला बोलते?

शीजी : (मिटल्या डोळ्यांनी) तुम्ही आमच्या चायनीज आयटेम अने एपवर बंदी घातली! पबजी वगैरे!! -त्याबद्दल थँक्यू!

नमोजी : (कपाळाला आठ्या घालत) सुरक्साच्या कारण होता, म्हणून बॅन घातला! नेशन फर्स्ट! पछी दोस्त!! सांभळ्यो?

शीजी : (कृतज्ञतता कंटिन्यू...) तेच तेच! तुम्ही बंदी घातल्यानंतर वर्षभरात तुमच्या देशात आमच्या चायनीज आयटेम आणि एप्सचा खप धडाधड वाढला!

नमोजी : (चक्रावून) एम?

शीभाई : (ठणकावून) एमने एमज!!

नमोजीभाई : (स्वत:शीच पुटपुटत) असा कसा काय झ्याला? अहियां हिंदुस्तानमां तुमच्या पबजी गेममाटे केटला लोच्या थई गया! तमे कछु कालाकांडी किधु के?

शीभाई : (डोळ्यांची फट किंचित रुंद करत) कालाकांडी म्हंजे?

नमोजीभाई : (स्पष्टवक्तेपणाचे उदाहरण घालून देत) जे तुम्ही गलवानमधी केला, तेच! लोच्या!!

शीभाई : (स्पष्टीकरण देत) इंडियामध्ये ज्या गोष्टींवर बॅन येतो, त्याचा खप आपोआप दुप्पट होतो, असा मार्केटचा अनुभव आहे! उदाहरणार्थ गुटखा, दारु, पबजी वगैरे!! ‘बॅन इज बून’!

नमोजीभाई : (नाक खाजवत) ‘बेन इज बून’ माने?

शीभाई : (प्रेमभराने) बंदी हे वरदान आहे! क्शी क्शी!! क़्शो क़्शो! क़्शा क्शा!!

loading image
go to top