Raj Thackeray
Raj Thackeraysakal

ढिंग टांग : आत्ता होतं, गेलं कुठं..?

ती एक माघातली प्रसन्न सकाळ होती. नेमकी तीथ सांगावयाची तर क्रोधी संवत्सरातील श्रीशके १९४६ ची माघ शु. प्रतिपदा. इये दिशी राजियांना क्रांतिकारक शोध लागला…
Published on

ती एक माघातली प्रसन्न सकाळ होती. नेमकी तीथ सांगावयाची तर क्रोधी संवत्सरातील श्रीशके १९४६ ची माघ शु. प्रतिपदा. इये दिशी राजियांना क्रांतिकारक शोध लागला…

‘शिवतीर्था’वरील बालेकिल्ल्यातून भर सकाळी ‘युरेका, युरेका, सापडलं बरं का!’ ऐशा गगनभेदी आरोळ्या उठल्या. वळचणीला आणि कट्ट्याला गुटरगुं करणारी कबुतरे अस्मानात उडाली. मैदानातल्या उरल्यासुरल्या जागेत क्रिकेटचा डाव मांडू पाहणारे उद्याचे सचिन तेंडुलकर प्यांटीतच दचकले!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com