
(निबंध लिहा : १० गुण)
मला शाळा खूप खूप आवडते. मी शाळेत रोज जातो. सुट्टी
पडली की मला शाळा आठवते, आणि शाळेत गेलो की सुट्टी
आठवते. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत जाताना मी रडलो. मग आईने माझे बखोट पकडून शाळेत नेले. शाळेत जाताना मी कटकट करत होतो, तेव्हा आई बाबांकडे रागारागाने बघत होती. बाबा पेपर वाचत होते. आई कुणाला तरी बैल म्हणाली. बाबांनी अंग शहारल्यासारखे केले. मग मी हंसलो. हसत हसत शाळेत गेलो…