दादू : (बंधुप्रेमाचा उमाळा दाटून येत) म्यांव म्यांव…पर्रर्रर्र..!
सदू : (नेहमीच्या विनम्रतेने) ए, कोणॅय?
दादू : (खेळीमेळीने) सदूराया, आज माझा आवाज ओळखला नाहीस? कशी केली एका माणसाची गंमत!
सदू : (घुश्शात) म्यांव म्यांव ही आमची भाषा नव्हे! आमची भाषा मराठी!!