

तीमर्त्यलोकात फाल्गुनातील दशमीची तिथी होती. फाल्गुन पौर्णिमेला अजून दोन-तीन सूर्योदय व्हायचे होते…शिमग्याचे वेध लागले होते. शिवाजी पार्कावरील ‘शिवतीर्थ’गडाच्या बालेकिल्ल्यातून गगनभेदी आरोळी ऐकू आली, ‘‘नाही, नाही, त्रिवार नाही! अशक्य!!’’ त्या आरोळीने गगने थरारली.
पृथ्वीचा अक्ष डळमळला.
‘‘नहाते वो है, जो गंदे होते है..चले जाव!,’’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला तो ऐतिहासिक आवाज पुन्हा घुमला. ‘‘राजे, ऐसे करो नका, आज स्नान करायला हवे!’’ कुणाची तरी काकुळत ऐकू आली. आवाज परिचयाचा होता. ‘शिवतीर्था’च्या पायथ्याशी उभ्या असलेल्या एका महाराष्ट्र सैनिकाने दुज्यास सांगितले : ‘‘बाळाजीपंत अमात्य आंघुळीची विनंती करुन ऱ्हायलेत!’’
‘‘हड, आम्ही नाही करणार असल्या पाण्यात स्नान! काय वेड लागलंय काय?’’ राजियांचा आवाज आला.