ढिंग टांग - विमानप्रवास : एक उडते अध्यात्म..!

इंडिगोच्या अंतहीन विलंबांत अडकलेल्या प्रवाशाच्या डोक्यात अचानक तत्त्वज्ञान जागे होते, आणि विमानतळ हेच अध्यात्माचे केंद्र बनते! ब्रिटिश नंदींची खास टिंगलटवाळी वाचकाला हसवत हसवत विचार करायला लावते.
A Timeless Journey Through Indigo’s Never-Ending Delays

A Timeless Journey Through Indigo’s Never-Ending Delays

Sakal

Updated on

जग हे असार आहे. मिथ्या आहे. अतर्क्य आहे. या जीवनात काहीही नाही. या मर्त्यलोकात आपण जसे आलो तसेच जाणार. मधल्या काळात थोडफार कपडे परिधान करुन वावरणार. बाकी आहेच काय? आम्हाला हे स्मशानवैराग्य आले, याचे कारण आमचे स्वाधिष्ठान का कुठलेसे चक्र प्रदीप्त झाले, असे आम्हाला २४डी या शिटेवरील पाशिंजराने सांगितले. होय, आम्ही ‘इंडिगो’च्या विमानाने निघालो होतो. गेल्या आठवड्यात (की गेल्या महिन्यात?) बहुधा आम्ही विमानतळावर आलो. पाचपंधरा नातलगांनी आम्हाला रीतसर निरोप दिला. तेव्हापासून स्थळ-काळाचे भान हरपले आहे. इतके की किती वाजले या प्रश्नाला आम्ही ‘बहात्तर’ असे उत्तर दिले!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com