Dhing Tang
sakal
स्थळ : कुनो नॅशनल पार्क, मध्य प्रदेश. वेळ : सकाळ असावी!
सगळं काही निसर्गनियमानुसार घडलं. नेहमीप्रमाणे सूर्य उगवला. कासराभर वर आला. नेपतीच्या झुडपात खसफस झाली. त्यातून वाघराचं मुस्कट दिसू लागलं. त्याची चावळ लागून आसपासच्या सावरी आणि अर्जुनाच्या वृक्षावरची वानरे सावध झाली. त्यांच्यातीर कानतुटक्या नराने खर्रर्र खक खक असा घशातून आवाज काढला. मोर केकाटले. कोल्ही बिळात दडली. कोळसुंदे (यांना रानकुत्रे असं म्हणतात, पण मराठी वन्यसाहित्याच्या नियमानुसार त्यांना कोळसुंदे म्हणावे.) नजीकच्या पाणवठ्यावर हुदाळे बिळात शिरले. हा प्राणी अजून दिसायचा आहे, पण तो अरण्यात गरजेचा असतो. सर्पगरुडाने चोचीतली नानेटी घाबरून खाली टाकली. एवढे सगळे केवळ वाघराचे मुस्कट दिसल्यामुळे घडले. तेवढ्यात...