
वरील मथळा वांचून काही वाचकांना पत्राचाळीतला पत्रा आठवेल. पण तो गैरसमज डोकीतून काढून टांका. ‘स्वर्गीय पत्रे’ ही खरीखुरी पत्रे आहेत. ख्यातनाम चरित्रलेखक श्री. संजयाजी राऊत यांनी काही काळापूर्वी भायखळ्याच्या नयनरम्य आणि निसर्गसुंदर ठिकाणी वास्तव्य केले. त्या वास्तव्यातील स्मृतिगंध आणि चिंतनगंध पसरवण्याच्या हेतूने त्यांनी ‘नरकातील स्वर्ग’ हे किताब लिहिले. सांगावयास आनंद होतो की, सदरील किताबाची तडाखेबंद विक्री होत आहे. सदरील किताबावर वाचकांच्या दणाद्दण उड्या पडल्या, यात काही नवल नाही. त्यातील शब्दलाघव, उपमा-उत्प्रेक्षा, अलंकार, आणि दाहक चित्रणाचा सुगंध मराठी साहित्यात सर्वदूर पसरला आहे. हे किताब काही ‘लाडक्यां’ना लेखकाने स्वाक्षरीनिशी घरी पाठवले. सोबत पत्रेही दिली (हीच ती पत्रे!) पत्रावरील मायना प्रत्येकांस वेगळाला आहे.