

Post-Election Relaxation: Where Will Maharashtra’s Top Leaders Head Next?
sakal
गेली दीड-दोन वर्षं भलतीच धामधुमीत गेली. सारख्या कुठल्या ना कुठल्या निवडणुका चालू आहेत. निवडणुकांनी आपलाच जीव इतका विटला असेल तर नेत्यांची काय कथा? लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायती आणि आता महापालिकांच्या निवडणुका. माणसाने किती म्हणून राबायचे याला काही लिमिट? सारे काही जनतेच्या कल्याणासाठी चालले आहे हे खरे, पण अपार कष्ट केल्यानंतर थोडा तरी श्रमपरिहार हवाच. नाही का? हाच पोक्त आणि माणुसकीयुक्त विचार करुन आम्ही काही मेहनती, कष्टाळू आणि जनतेसाठी राब राब राबणाऱ्या दिग्गज नेत्यांना प्रश्न विचारला : निवडणुकीनंतर काय करणार? कुठे जाणार? नेत्यांकडून आम्हाला विविध उत्तरे मिळाली. काही ऑन रेकॉर्ड, काही ऑफ द रेकॉर्ड! त्यातलीच येथे काही अपेक्षित (आणि अनपेक्षित) उत्तरे देत आहो.