

Post-Election Silence and Democratic Concerns
sakal
मुन्शिपाल्टीच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढे बराच काळ शांतता निर्माण होणार असून लोकशाहीसाठी हे काही फारसे पोषक चित्र नव्हे. कुठे ना कुठे कोणीतरी कोकलते आहे, हे चित्रच लोकशाही सुदृढ करणारे असते. यासाठीच विरोधी पक्ष तगडा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तथापि, पुढील बराच काळ, म्हंजे सुमारे तीन-साडेतीन वर्षे सगळ्याच आघाड्यांवर शांतता प्रस्थापित झाल्यानंतर नेमके करायचे काय, असा प्रश्न विरोधकांना पडणार आहेच, पण सत्ताधाऱ्यांनाही पडल्याशिवाय राहणार नाही. काळाची ही पावले ओळखून आम्ही एकच सवाल खडा केला- ‘पुढली तीन-चार वर्षे काय कार्यक्रम करणार?’ हाच शंभर नंबरी सवाल घेऊन आम्ही काही निवडक नेत्यांची मने चाचपली. उत्तरे मिळाली ती येणेप्रमाणे :