दादू : (रिकाम्या वेळेत फोन करत) म्यांव म्यांव...!
सदू : (रिकाम्या वेळेतच फोन उचलत) बोल, दादूराया, बोल!
दादू : (ओशाळून) ओळखलास वाटतं माझा आवाज! मुद्दाम मांजराचा काढला होता!
सदू : (हरभऱ्याच्या झाडावर चढवत) तू मांजराचा आवाज काढलास, तरी डरकाळी ऐकू येते, दादूराया!!
दादू : (खुशालत) कसा आहेस?
सदू : (खेळीमेळीनं) नेहमीप्रमाणे मज्जेत! आत्ताच बटाटेवडे खाल्ले!!