

प्रिय मित्रवर्य श्री. रा. भाईसाहेब आणि दादासाहेब, तुम्ही दोघेही माझ्यावर रागावला आहात, याची मला नम्र जाणीव आहे. आज बैठकीला भेटलात, पण घुश्शातच होता. मला फार्फार वाईट वाटले. भाषण नाही तर नाही, पण संभाषणदेखील करायचे नाही? हे काही योग्य झाले नाही. परवा रायगडावर आणि काल दादरमध्ये तुम्हाला भाषण करण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल खरोखर वाईट वाटते. पण माझा नाइलाज होता. ऐनवेळी कुणी तुमची नावे वक्त्यांच्या यादीतून वगळली, याचा शोध घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. अजून तरी पुरावा हाती लागलेला नाही. पुरावा मिळाला की कठोरात कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. काळजी करुaनका, गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा लौकरात लौकर व्हावी, म्हणून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश मी दिले आहेत.