
आजचा दिवस : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ ज्येष्ठ शु. त्रयोदशी. आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसे मनमौजी को मुश्किल है समझाना..!
……………………
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) जग इकडे तिकडे होवो, मी डायरी रोज लिहितो. पहाटे शपथ घेतली होती, त्या दिवशी फक्त रोजनिशी लिहू शकलो नाही, कारण दिवस कधी सुरु झाला आणि कधी मावळला, हे कळले नव्हते. आमचे बांदऱ्याचे माजी मित्र आणि शिवाजी पार्कचे आजी मित्र यांची युती होणार, अशा वावड्या आहेत. न्यूज अजून कन्फर्म होत नाही. हे दोघे सोडून बाकी सगळेच छातीठोकपणे युती होणार असे सांगत फिरत आहेत. मला यात काडीचा इंटरेस्ट नाही.