
ढिंग टांग
सर्वप्रथम सर्व नवनिर्वाचित मंत्रिमहोदयांचे हार्दिक अभिनंदन. फारा दिवसांनी हा योग आला. याला कारणीभूत केवळ शनि-शुक्र या ग्रहांनी केलेली मेहेरनजर आणि एकादश योग हेच आहेत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी. मार्गशीर्षात खातेवाटप होणे केव्हाही चांगलेच. महाराष्ट्राला अखेर मंत्रिमंडळ मिळाले, तेव्हा महाराष्ट्राच्या मतदारांचेही अभिनंदन करणे गरजेचे आहे. कारण याचसाठी आपण मतदान केले हे बिचारे मतदार विसरुनच गेले होते. नागपूर येथील अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर सर्व सदस्य आपापल्या बॅगा भरुन निघून गेले.