नवशब्दांचे बांधुनि घुंगूर रसवंती ज्यांचीनाचवि डोलवि मने मराठी भाषा रसिकांचीशब्दशारदे! तुझ्या अंगणी सळसळ ये कानीहाच वृक्ष तो, पिंपळ-ज्याला कविता पानोपानी.तुझ्या महाली लखलख झुंबर-पणत्यांची रांगपुष्करिणीतिल कारंज्याचा रोज बदलतो रंगसंगमरवरी सौधावरती नाच कपोतांचामान वेळुनी पुनश्च बघतो राजहंस साचा.दीड वितीच्या दुनियेमधली बडबड भवतालीकुणी टोचुनि म्हणे-प्रभुची ही तर शब्दहमालीतरी न थांबे मुग्ध मानसी राम गणेशाचीअंजन कांचन करवंदीच्या मराठी वळणाची.याच भुईतुनि सरसरला तो अंकुर भाषेचाकुण्या शिळेवर शब्द उमटला मुकुंदरायाचायाच शिवारी कधी बहरले महदंबेचे ढवळेविठुरायाच्या वारकऱ्यांचे, अद्वैताचे मळे.माय मराठी, तुझिया ओठी अभिजाताचे गीतबहिणेच्या जात्यातुनि सांडे ओव्यांचे पीठज्ञानेशाच्या मुखी उमटले विश्वाचे आर्तसंतांच्या वचनात ओघळे इथेच परमार्थ.इथेच घुमले मत्त पवाडे, अभंग अन ओव्यासानथोर वा कुणी भिकारी, मुक्तकंठ गाव्यासंत पंत अन शाहीरांची मिरास अभयाचीमाय मराठी गळ्यात तुझ्या वीणा तुकयाची.व्यंग विनोदे, काव्य प्रमोदे प्रतिभेचे वेल्हाळतुझ्या अंगणी शब्दशारदे, वाजे घुंगुरवाळहे प्रतिभेचे लेणे त्याला अलौकिकाचे बळतुझ्या अंगणी धरी सावली सोन्याचा पिंपळ.रंगशारदे! तुझिया पोटी चांदाचा गर्भचंदनकायेवरती तुझिया चांदीचा वर्खपायदिव्यांच्या उजेडातले ते प्रतिभेचे जगकेशरशेतामधि बागडतो जणू कस्तुरीमृग.तुझ्या अंगणी अजून दर्वळे नांदीचा धूपतीन भिंतीच्या दुनियेमधले नवे रंगरूपइथे होऊनि रंगचि झाले अभिनयसम्राटकल्पतरूंचे इथे पोसले अरण्य घनदाट.सुधाकराचा एकच प्याला, सिंधूचे भोगभावबंधनी घनश्यामाच्या सुडाची आगअथांग दरियामध्ये रंगली प्रीतीची गाथारायाच्या छातीवर घुसळे शिवांगीचा माथा.हा सोन्याचा पिंपळ त्याचा बोल सुवर्णाचावैजयंतीचा हार रसिकहो, गळ्यात रखुमाईचाया पानांच्या दहीवराचा बंध अत्तराशीया वृक्षाने अशी जिंकिली पैज अमृताशी!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.