

Political Satire Through Dramatic Allegory
Sakal
प्रवेश पहिला : (सुप्रसिद्ध दादोजी इनामदारांचा वाडा. याला ‘मातोश्री’ असेही म्हणतात. ‘मेल्या पडदा उघड’ अशी दबक्या आवाजात सूचना स्वच्छ ऐकू येते. ‘नको रे, इतक्यात नको’ अशी दुसरी सूचना पाठोपाठ ऐकू येते. पडद्यामागील रंगमंचावर एक अस्फुट गदारोळ. त्या गोंधळातच पडदा अर्धवट उघडतो. अब आगे.)
दादोजी इनामदार : (प्रविष्ट होत) कोण आहे रे तिकडे? आमचे बंधो राजाजी येणार होते, आले नाहीत का अजुनी? त्यांना वेळ पाळायला कुणी शिकवलेच नाही काय?