

The Long-Awaited Return of Municipal Elections
sakal
अनेक वर्षे ज्याची वाट पाहिली, त्या मुन्शिपाल्टीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वत्र एकच धावपळ उडाली आहे. आता या देशात मुन्शिपाल्टी भरणारच नाही, असे वाटू लागले होते. गेली पाच-सात वर्षे अतिशय सुनसान गेली. महापालिकांची मुदत संपल्यानंतर काही काळ नगरसेवक टेचात वावरत होते, परंतु, हळूहळू त्यांची रया गेली. रस्त्यात उभे राहिल्यानंतरही कुणी साधा नमस्कार करीना! इच्छुक नगरसेवकांचा उत्साह निमाला होता. काही इच्छुकांनी तर लोकल राजकारण सोडून नोकरी बिकरी धरल्याचेही कळले. डझनभर इच्छुक नगरसेवकांनी तर सगळाच नाद सोडून चक्क लग्नेच केली. ही मंडळी आजकाल कडेवर भविष्यातील नगरसेवक घेऊन हिंडताना दिसतात. असो.