

New Leadership
New Leadership
ढिंग टांग
मान्यवर नितीन नबीनजी, सतप्रतिसत प्रणाम! सर्वप्रथम जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वकाळात आपल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पक्षाला सुयश प्राप्त होवो ही श्रीरामलल्लांच्या चरणी प्रार्थना.
तुमच्या आधी मी पार्टीचा अध्यक्ष राहिलो आहे. मला अनुभव दांडगा आहे. ही खुर्ची वाटते तितकी सोपी नाही, आणि नीट वागले तर या खुर्चीइतकी सुखाची जागा नाही. फक्त दोघांचे ऐकले तरी काम भागते. बाकी कोणाचीही पत्रास ठेवावी लागत नाही.