Dhing Tang
sakal
बेटा : (नेहमीप्रमाणे जोशात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्यात मग्न...) हं! भूक लागली असेल तर टेबलावर तुझ्यासाठी पास्ता ठेवला आहे!
बेटा : (कंटाळलेल्या सुरात) मी असलं काही खात नाही! मी आत्ताच चायबिस्कुट खाऊन आलोय! एक कप चाय आणि पार्लेजीचा अर्धा पुडा!
मम्मामॅडम : (पक्षकार्याचे दस्तऐवज तपासताना) ही चायबिस्कुट खाण्याची वेळ नाही, देश वाचवण्याची आहे!