ढिंग टांग : विलीनीकरण : नरो वा कुंजरो वा..!

वि. सू : माझा व्यक्तिश: या चर्चेत काहीही हेतू वा सहभाग वा लाभ नाही, याची कृपया नोंद घ्यावी!
 NCP factions consider reunification amid ongoing discussions.

NCP factions consider reunification amid ongoing discussions.

sakal

Updated on

डिअर सुनीलजी तटकरेसाहेब, प्रदेशाध्यक्ष यांसी, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अखंड करुन नवीन सुरवात करण्याची कल्पना तशी जुनीच आहे. मी स्वत: अध्यक्ष होतो, तेव्हा किमान अकरावेळा या विषयावर चर्चा केली आहे. अकरा चर्चा इज इक्वल टु अकरा जेवणे!! विलिनीकरणाच्या भानगडीत माझे वजन तेवढे वाढले!! सुदैवाने बाराव्या जेवणाच्या थोडे आधी मी अध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली म्हणून वाचलो.

आमच्या राष्ट्रवादीत चर्चा होत असल्या तरी तुमच्या राष्ट्रवादीत काय परिस्थिती आहे, हे कळेल का? त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मध्यंतरी मी श्री. भुजबळसाहेबांना आपण पुन्हा एकत्र येणार, अशी हिंट दिली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत लग्गेच सुधारली. माझा तोच हेतू होता... असो. खरोखर काही तथ्य असेल तर कृपया कळवावे. त्यावर माझे(ही) बरेच काही अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे! अधिक सांगणे नलगे. आपलाच. ज. पा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com