

Satirical Take on Local Body Election Results
sakal
माझ्या पक्ष सहकाऱ्यांनो, आणि महायुतीबितीतल्या आमच्या सहकाऱ्या-बिहकाऱ्यांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. नुकत्याच झालेल्या स्थानिक नगर पंचायत आणि परिषदांच्या निवडणुकीत आमचा पक्ष नंबर एकचा ठरला असून स्ट्राइक रेटही सर्वाधिक आमचाच आहे. नुसता स्ट्राइक रेटच नव्हे, तर एकंदरच रेट बराच वाढीव आहे, हे एव्हाना लोकांना कळून चुकले असेल. जवळपास ४८ टक्के म्हणजे निम्मे उमेदवार आमचेच निवडून आले. एकाच पक्षाचे तीन-साडेतीन हजार नगरसेवक आपल्याच पक्षाचे आहेत. उरलेले महायुतीबितीच्या सहकाऱ्या-बिहकाऱ्यांनी उचलले आहेत.