

The Dream of Becoming a Corporator
Sakal
कुठल्याही परिस्थितीत पुढल्या इलेक्शनीला नगरसेवक व्हायचे आणि सडकून लोकसेवा करायची, या इराद्याने बंटीने तरुणपणापासूनच पावले टाकली. अनेक ठिकाणी सतरंज्या उचलत उन्हाळे-पावसाळे घालवले. तथापि, नगरसेवक व्हायचे स्वप्न लांबणीवर पडत चालल्याने बंटी घायकुतीला आला होता. अखेर निवडणुका जाहीर झाल्या आणि बंटीच्या स्वप्नाने उचल खाल्ली.