

Post-Election Political Reality
Sakal
दादू : (इकडे तिकडे बघत सावधपणाने फोन फिरवत) म्यांव म्यांव…चुं चुं चुं..चुचुक!
सदू : (कपाळाला आठी रिटर्न्स…) कोणॅय? कायॅय?
दादू : (घाईघाईने) अरे, सदूराया, मी बोलतोय…तुझा बांदऱ्याचा भाऊ!
सदू : (आणखी जोरात खेकसत) कोऽऽण?
दादू : (घायकुतीला येत) असं काय करतोस? अरे, मी दादू!!
सदू : (जरासे निवळत) तू होय! बरं…बोल! गेले दोन दिवस काही नतद्रष्ट लोक निनावी फोन करुन नुसते हसतात! अस्सा राग येतो!!