
स्थळ : समव्हेअर इन दिल्ली! वेळ : समटाइम इन दिल्ली!!
जुन्या महाराष्ट्र सदनातील वाटावी अशी खोली. याने की छताचे पोपडे, उखणलेल्या फरश्या, भिंतीवर ओल वगैरे. मधोमध तीन खुर्च्या. त्यातल्या दोन भरलेल्या. एक भरलेली असून रिकामी असल्यासारखी. अब आगे…
नानासाहेब : (घाईघाईन एण्ट्री घेत) सॉरी हं! नीती आयोगाच्या मीटिंगला जावं लागलं, म्हणून थोडा उशीर झाला! मुंबईत आपल्या भेटी हल्ली होत नाहीत, म्हणून इथंच भेटून घेऊ या म्हटलं…
भाईसाहेब : (पेपरमिंटची गोळी चघळत) किती उशीर हा! मला निघायचं होतं...
दादासाहेब : (घड्याळात बघत) आणखी पाच मिनिटं वाट बघणार आणि मी निघणार! मंथ एंड आहे…