

Pune Book Festival and the New Reading Culture
Sakal
नअस्कार! फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणात भरलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात सर्वाधिक गर्दी सेल्फी पॉइण्ट्सवर होती. हातात (विकत घेतलेली) पुस्तकं घेऊन सेल्फ्या काढून घेणारी इतकी तरुण मुलं मुली दिसली की निदान सेल्फीसाठी तरी पुस्तकं विकत घ्यायला हवीत, असं वाटायला लागलं. बाकी ‘पुणे लिट फेस्ट’च्या वातावरणानं धमाल आणली हे मान्य केलंच पाहिजे. परवा मी अशीच बेसावधपणे सेल्फी घेत होते, तेवढ्यात कुणीतरी बातमी आणली की साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या मांडवाचं भूमिपूजन झालं, आणि पहिली कुदळ पडलीसुद्धा! घ्या, म्हंजे मला मेलीला आता सवड म्हणून उरली नाही!