

Pune’s Rich Reading Culture and Library Landscape
Sakal
नअस्कार! पुण्यात जवळपास अडीच-तीन हजार लायब्रऱ्या आणि अभ्यासिका असाव्यात, असा एक प्राथमिक अंदाज आहे. पुण्याची लोकसंख्या सुमारे ७२ लाख असावी, असा दुसरा एक भीत भीत अंदाज आहे. बहात्तर लाखांसाठी फक्त तीन हजार लायब्रऱ्या ही उदाहरणार्थ पुणेकरांची वैचारिक उपासमारच, असं कोणीही म्हणेल. पण वाचकहो, तसं काही नाही. एवढी पुस्तकं पुणेकरांना पुरतात, असाच याचा अर्थ!