Dhing Tang
sakal
‘बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे’, अशी पाटी उपाहारगृहांमध्ये दिसते. ती पाहून कपाळास आठी घालावी की ‘आतील खाद्यपदार्थ खाणे जोखमीचे आहे’, अशी नवी पाटी सक्तीची करावी या विचारात आम्ही सध्या मग्न आहोत. नागरिकांस आरोग्यपूर्ण खाद्यान्न आणि औषधे मिळालीच पाहिजेत, या आग्रहापोटी आम्ही जी सरकारी चळवळ तूर्त चालवली आहे, त्यास सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे.