

Rat's Sense of Smell: Scientists Discover Unique Abilities
Sakal
वैभव चाळके
‘प्रारंभी विनंती करू गणपती...’ असे म्हणत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची आपली अनेक वर्षांची परंपरा आहे. या आद्यदैवत असलेल्या श्री गणेशाचे वाहन म्हणजे उंदीर. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात त्याने भावनिक महत्त्व प्राप्त केले आहे. वैज्ञानिक क्षेत्रातही त्याचा वावर दिसतो. मोठी प्रगती केलेली दिसते. माणसावर करायचे कोणतेही नवे प्रयोग प्रथम उंदरावर करून पाहिले जातात. अलीकडे काही शास्त्रज्ञांनी उंदराच्या नाकात हवेचा वेग आणि विविध वास ओळखण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. या संशोधनाचा उपयोग माणसाच्या जीवनाला उपकार ठरेल, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.