
ढिंग टांग
हात लिहिता असावा. पाय फिरता असावा, डोके चालते असावे, आणि तोंड खाते असावे. यापैकी खात्याचा विचार आज आपण करणार आहो. कां की, लोकशाहीत या (सरकारी) खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खाते या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ विभाग, कक्ष असा काहीसा होतो. परंतु, मराठी भाषेत मात्र खाते हे क्रियापददेखील आहे. उदा. मी बटाटेवडा खाल्ला. मी शिव्या खातो किंवा मी नको ते खातो वगैरे. अर्थात खात्याचा खाण्याशी संबंध फक्त तोंडीलावण्यापुरता किंवा पोट भरण्यापुरता नाही. खाते हा बहुआयामी मामला आहे. खाते हे हमेशा खाते असले पाहिजे.