

Thackeray-Wakare, Mindhe-Bindhe, Patel-Bitel Debate
sakal
दादू : (हळूच फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव…पुर्रर्र..!
सदू : (वैतागून फोन उचलत) मी ओळखलाय तुझा आवाज! मांजराचे आवाज कशाला काढतोस? वाघ आहेस ना?
दादू : (जीभ काढत हसून) ती आपली कोड लँग्वेज आहे ना! समोर कोण बोलतोय बिलतोय हे कळायला नको का? ठाकरे आहे की वाकरे आहे, मोरे की गोरे आहे, मिंधे की बिंधे आहे…
सदू : (वैतागून) जरा पटेल असं बोल!
दादू : (उसळून) मी पटेल असंच बोलतो, पण तुझं बोलणं सगळ्यांना पटेल असं नसतं! उगीच कशाला दुसऱ्याच्या पक्षांच्या उठाठेवी करायच्या? राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल असू नये, हे बोलायची काहीही गरज नव्हती!
सदू : (थंडपणाने) सुरवात तूच केलीस!