हौस ऑफ बांबू : लाखमोलाचा माणूस…! (एक अनोखी अरण्यकथा…)

पाऊस पडून गेला असावा. झाडं अजून ओलेती होती. पाखरांची किलबिल पुन्हा सुरु झाली होती. काटेसावरीवर साळुंक्यांनी थैमान मांडलं होतं.
Wildlife
WildlifeSakal
Updated on

हौस ऑफ बांबू

पाऊस पडून गेला असावा. झाडं अजून ओलेती होती. पाखरांची किलबिल पुन्हा सुरु झाली होती. काटेसावरीवर साळुंक्यांनी थैमान मांडलं होतं. बेहड्याच्या गर्द पानोळ्यातून कोयाळ कुकारा करत उडाली. ( खरं तर हिते गोची झालीय. आधी म्हटलं पाऊस पडून गेला, मग आता कोयाळ ओरडण्यासाठी वसंत ऋतु कुठून आला?) रुईच्या झुडपामागून भारद्वाजाचं जोडपं जमिनीवर उतरुन पुन्हा किडे खाऊ लागलं. ( या पक्ष्याचं नाव बदला. चांगलं ऋषींचं नाव ठेवलंय, किडे कसले खातो लेकाचा?) रायमुनियाच्या झुडपात शिंपी पक्ष्याच्या मादीनं गोदा केला होता. (खुलासा : गोदा म्हणजे घरटं..! पण सगळेच पक्षी गोदा करत नाहीत,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com