ताठ कण्याचा लवचिक बाणाअनब्रेकेबल जुनापुराणाभजी देखता वडा मागतोउगाच हसतो हुशार काणापाठकण्याचा महिमा ताठकभिन्न फत्तर, विशाल पाठसह्यकड्याचा आणून आवधुळीस मिळवी दुश्मन साठ.दुश्मन अमुचे सत्राशेसाठतरीही अमुची आहे गाठफोडू दंभाचे माठकळिकाळाला पाहुन साचाशत्रूची मग बसते वाचाअस्मानावर थुंकून पुसतो‘‘बोल, इथे आव्वाज कुणाचा?’’केवळ अमुचा श्वास मराठीतुटतो दिल हा तुमच्यासाठीलवा खालती, उभे राहुनीनाव नव्हे हा ब्रँड मराठी!ब्रँड आमुचा जबरी होकणा नसे हा रबरी होबोरे खाते शबरी होमराठि माणुस काढी झोपाबैल चोरिला गेला बापागद्दारांची नकटी नाकेतलवारीने कापा कापाइतिहासाच्या पानोपानीगद्दारीची जुनी कहाणीफंदफितुरीच्या शापासाठी.उ:शापाची भगवी वाणीभगवा सारा एकच एकभाऊबंदकीचे खेळ अनेकवैर टाकुनी प्या मिल्कशेकविजापुराहुनि अफजुलखानदिल्लीकडुनि खिलजी खानलोंढ्यामागुनि लोंढे येतीतरिही लवते मऱ्हाटी मानमज्जारज्जूमध्ये अस्मिताठासुनि भरली येताजाताकणा नव्हे हा, इंद्रवज्र तेतयापुढे ना मायाममतावज्रमुठीचे रणकंदनरणात झाले मनमीलननाते अमुचे आजीवनमोडुनी पडली मान जरीवाकत नाही कणा तरीवादळवारे, विजा गारपीटपरतुनी जाती पुन्हा घरी.Premium|Moon Landing Conspiracy : चंद्रावर माणूस उतरलाच नाही? 'मून लँडिंग'च्या भयंकर षड्यंत्र सिद्धांतांमागचे सत्य काय?.मऱ्हाटमोळ्या गर्दाव्याचीहीच कहाणी बरवी साचीमहानगर हे तुम्हा अम्हालाही तर झुंजाराची माचीअठरापगडी महानगरत्यावर घारीचीच नजरमराठमोळा होई गजरमऱ्हाटमोळी ताठ कहाणीकाय वानुं म्या येड्यावाणी?सळोपळोच्या कोल्हाळालामर्द तुतारी चढवी पाणीकणा पडे ना गहाणखततरीही पाहुनि वेळवखतताठ कणाही मऊच होतो,थंडही होते तप्त रगत.लोकशाहीच्या खेळातइकडेतिकडे बघतातहळूच पत्ते खुलतातताठ कण्याची मिजास भारीराजकारणी गंमत न्यारीअसा पेच मग टाकावा कीस्वत:स यावी स्वयंशिसारी!ताठकण्याला आहे ठाऊककधी झुकावे, व्हावे लवचिकलवलव करिती बघा लव्हाळीजगण्यासाठी सारे कवतिकम्हणुनी सांगतो-पाठकण्याचा महिमा ताठकभिन्न फत्तर, विशाल पाठसह्यकड्याचा आणून आवधुळीस मिळवी दुश्मन साठ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.