Dhing Tang
sakal
सुटलो! शिवीगाळ करणे ही अश्लीलता नव्हे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेच दिला असल्याने आम्ही सु-ट-लो!! आमच्यावरील बालंट गेले. आमची भाषा बरी नाही, असा आरोप आमच्यावर हमेशा केला जातो. पण आम्ही सामान्यांची भाषा बोलतो. ज्याला ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत आम्ही सुनावतो. उगीच ॲचॅ ॲचॅ करीत बोलायला आम्ही काही बुळबुळीत व्यक्तिमत्व नाही. आज महाराष्ट्रात आमचा दबदबा आहे. आमच्या रोखठोक लेखणीवाणीला धार चढली की भले भले माना टाकतात. शिव्या ही अश्लीलता नाही, हे आम्हाला आधीच माहीत होते, त्यामुळे या भाषाविशेषाचा मन:पूत वापर आम्ही केला आणि यापुढेही करूच करू!