प्रिय नानासाहेब फडणवीस यांसी, जय महाराष्ट्र. हे गोपनीय पत्र लिहिण्यास कारण की कालपासून सारखे माझ्या डोळ्यासमोर ग्रुप फोटोचे दृश्य येते, आणि फोटोग्राफरची ‘स्माइल प्लीज’ अशी साद ऐकू येते आणि दचकून जाग येते. स्माइल प्लीज हे शब्द इतके रडवेले करतील, असे वाटले नव्हते. ग्रुप फोटोच्या वेळी माझा सगळाच मूड गेला, तो अजून चांगला झाला नाही.