ढिंग टांग : गंगा की सौगंध!

बेटा : (नेहमीच्या सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण ट ढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!
Dhing Tang
Dhing TangSakal
Updated on
Summary

बेटा : (नेहमीच्या सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण ट ढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

बेटा : (नेहमीच्या सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण ट ढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (नेहमीप्रमाणे कामात व्यग्र…) हं!

बेटा : (गंगाघाटावरल्या याचकाप्रमाणे ) हरि ॐ…मां, कुछ दे दो मां..! बाबा, तुम्हारा भला करेगा!!

मम्मामॅडम : (चमकून बघत) …ओह, गॉड, हा काय वेष? धूतवस्त्रं? भस्माचे पट्टे? खांद्याला पडशी? आधी जाऊन तू कपडे बदलून ये!!

बेटा : (विरक्तपणे) मम्मा, मी काशीला चाललो आहे!

मम्मामॅडम : (कडवटपणाने) तसे आपण सगळेच काशीला चाललो आहे! कोण आधी पोचतोय, तेवढं बघायचं…

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) काल मी अमेठीला गेलो होतो मम्मा! अमेठी मेरा घर है, उसीने मुझे राजनीती सिखाई! तिथं मी भाषणात हेच सांगितलं!

मम्मामॅडम : (हादरुन) कर्म माझं! अमेठी तुम्हारा घर है, तो फिर वायनाड क्या है? आता वायनाडवाले रागावणार नाहीत का? अमेठी झाली, वायनाड झालं, आता काशी कुठून डोक्यात घेतली आहेस?

बेटा : (आक्रमक पवित्र्यात) मैं मेरी काशी नहीं दूंगा!! झाशी हो या काशी, स्वतंत्रता है अविनाशी!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) हे आता काय नवीन?

बेटा : (गंगासक्त मनाने) मम्मा, मीसुद्धा गंगेत बुडी घेणार!

मम्मामॅडम : (अंगावर शहारा आल्यागत) छे, भलतंच काहीतरी! कुठेही बुडी घ्यायला जायचं नाही! ही का आपली कामं आहेत?

बेटा : (कपाळाला आठ्या…) बट व्हाय? मला तर सूरसुद्धा मारता येतो! मागल्या खेपेला मी त्या दक्षिणेतल्या मच्छिमारांसमवेत समुद्रात उडी घेतली होती, आठवतंय ना? उडी मारणाऱ्याला बुडीचं काय कौतुक?

मम्मामॅडम : (मतभेदाच्या सुरात) ते मोदीजी वागतात, तसं वागायला जाऊ नकोस! त्यांना मारु दे गंगेत नाहीतर यमुनेत उडी! आपण कशाला त्यांच्यासारखं वागावं? मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? (छद्मीपणाने) काय पण आव आणला होता त्यांनी? फू:!! सगळा नुसता देखावा!!

बेटा : (घड्याळाकडे बघत) मी स्ट्रेट तीन मिनिटं सेहेचाळीस सेकंद अंडरवॉटर बुडी मारुन श्वास रोखून दाखवू शकतो! मोदीजींनी तर हार्डली पाच सेकंदाची बुडी मारली!!

मम्मामॅडम : (हाताची घडी घालत) पण आख्खा देश त्यांच्यासाठी पाच सेकंद श्वास रोखून टीव्हीला चिकटला होता, हे विसरु नकोस! त्या लोकांना जसं मार्केटिंग जमलंय, तसं आपल्याला अजूनही जमलेलं नाही!

बेटा : (निर्धाराने) मी आपल्या रणदीप सुरजेवालांशी पैज लावली आहे, तीन मिनिटांच्या गंगाबुडीची!!

मम्मामॅडम : (निक्षून) विकासाच्या गंगेत जो बुडी मारेल, तो खरा नेता!

बेटा : (उत्साहाने) काल मी भाषणात तेच म्हणालो! मोदीजी गंगा में डुबकी तो लगाते है, लेकिन बेरोजगारी की, महंगाई की बात तो करते नहीं? क्योंकी उनके पास जबाबही नहीं है! जबाब मैं दूंगा!! गंगा में डुबकी भी लगाऊं गा, और जबाब भी दूंगा!!

मम्मामॅडम : (दिलासा देत…) वाक्य चांगलंय, पण ते बुडीचं प्रकरण तूर्त बाजूला ठेवलेलं बरं! या देशात विकासाची गंगा आणणारा भगीरथ हवा आहे! तू होशील ना बेटा?

बेटा : (स्वप्नाळू मुद्रेने) आपल्या देशात मी विकासाची गंगा आणीन, आणि त्यात पहिली डुबकी मीच घेईन! यह है गंगा की सौगंध! लगी शर्त?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com