गप्पा गोष्टी : प्रदर्शनाचा ‘सोशल’ अतिरेक!

माझ्या गोड, मनमिळाऊ शानूला हबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... माझ्या नशिबाने मला एवढा छान नवरा मिळाला.
माझ्या गोड, मनमिळाऊ शानूला हबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... माझ्या नशिबाने मला एवढा छान नवरा मिळाला.
माझ्या गोड, मनमिळाऊ शानूला हबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... माझ्या नशिबाने मला एवढा छान नवरा मिळाला. Sakal

- शुभदा रामसिंग

सुप्रभात डिअर... गुडमॉर्निंग डार्लिंग...

- माझ्या गोड, मनमिळाऊ शानूला हबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... माझ्या नशिबाने मला एवढा छान नवरा मिळाला. इतका समंजस आणि माझ्या प्रत्येक सुख-दुःखात, अडीअडचणीत साथ देणारा जोडीदार देवाने माझ्यासाठी पाठवला. त्याचे शतशः धन्यवाद!!

- एवढी देखणी आणि समजूतदार, घर आणि नोकरी सांभाळणारी, माझ्या आई-वडिलांवर आपल्याच आई-बाबांसारखी माया करणारी बायको मला नशिबानेच मिळाली. माझ्या शोनुलीला शुभेच्छा!!

- माझ्या समजूतदार आणि मनमिळाऊ बच्चाला २१ व्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!

- १८ वर्षे जीने आमच्या आयुष्यात आनंद फुलवला त्या आमच्या सुंदर परीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

असल्या शुभेच्छा कुठेतरी वाचल्यासारख्या वाटताहेत ना! अर्थात... फेसबुक ऊर्फ ‘एफबी’वर.

वाचल्यावर असं वाटतं, की ही सर्व मंडळी आता एकत्र राहत नसावीत. म्हणजे मुलं नोकरीसाठी बाहेर राहत असावीत आणि नवरा-बायकोसुद्धा ‘बागबान’ चित्रपटासारखे दोन मुलांकडे दोघं राहत असावेत.

त्यामुळेच एकमेकांना रोज असं शुभेच्छा देणं, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा सोशल करणं ही बिचाऱ्यांची गरज असेल. हां हां, थांबा जरा. तसं काही नाही! सगळेच नवरा-बायको वेगळ्या शहरातच काय वेगळ्या घरात किंवा वेगळ्या रूममध्येसुद्धा नाहीयेत.

खरंच! एकाच रूममध्ये बसून हे असलं चॅटिंग करणं म्हणजेच सोशल होणं, असं म्हणतात बुवा. म्हणजे माणूस समोर असूनही त्याच्याशी बोलायचं नाही आणि बेबी, शोनू, मोनू असं म्हणून आपलं प्रेम (?) सारखं व्यक्त करायचं. तसं पार्टनरने नाही केलं तर, ‘तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये’ असं म्हणून भांडण काढायचं. बरं यात फक्त तरुणाईच सहभागी नाहीये...

माझ्या ओळखीतले ६०-६५ च्या वयाचे नवरा-बायकोही ‘एफबी’वर अशा पोस्ट एकमेकांना टॅग करून पाठवत असतात. आहे की नाही गंमत! आपण किती जगाच्या बरोबर आहोत. मागासलेले, बुरसटलेले नाही आहोत, हे दाखवण्याचा हा अट्टहास आपल्याला किती हास्यास्पद बनवतोय हे कळत नसेल त्यांना! शिंग मोडून वासरात सामील होण्यात काय हशील! आणि तेही वाट चुकलेल्या वासरात...

पूर्वी लोकांना प्रेम व्यक्त करायला एक प्रेमळ कटाक्ष पुरत होता. अशी नजरबंदी आजूबाजूला दहा माणसं असूनही गालावर गुलाब फुलवत होती. त्यासाठी नंतर स्पर्शाची भाषा आली. पुढे ते स्पर्श चारचौघातही धीट झाले. चित्रपटाच्या पडद्यावर अधिक आक्रमक झाले आणि ओटीटीच्या माध्यमातून तर ओंगळवाणे झाले.

आता तरुणाईमध्ये गरजेपुरते स्पर्श माध्यम आणि बाकी सगळा सोशल कारभार असं झालंय. आता या क्षणाला कुठे गेलोय, काय खातोय, काय पितोय आणि काय करतोय हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. नाहीतर जगबुडी होईल.

आपलं नामोनिशाण नष्ट होईल, अशी त्यांना सतत भीती वाटत राहते. त्यासाठी ही संपर्कमाध्यमं सतत अपडेट राहिली पाहिजेत. माझ्या लहानपणी चणे-शेंगदाणे घेतले, तरी ते घरी गेल्यावरच खायचे. रस्त्यात पुडी उघडायची नाही.

‘नजरचं खाऊ नये’ अशी सक्त ताकीद असायची. आता बघावं तर पुढ्यात आलेल्या अन्नाचा आधी फोटो काढायचा. तो सोशल करायचा आणि मग त्यावरच्या कमेंट्स वाचत वाचत, बघूयाच कोणाची नजर बाधतेय ते म्हणत खायला सुरुवात करायची. सगळ्याचं प्रदर्शन महत्त्वाचं. त्याशिवाय अन्नालाही चव नाही. भावनांचं प्रदर्शन, त्याशिवाय नात्याला चव नाही.

अशा सगळ्या माध्यमांचा चांगला उपयोग करता येतो, हे आता शाळेतच शिकवणं गरजेचं होऊन बसलंय आणि शाळा अजूनही आठवीपर्यंत परीक्षाच घेत नाहीये. त्याच्या पुढच्या मुलांना या शिकवणुकीची गरज नाहीये... आता बालवाडी-नर्सरीच्या मुलांना मोबाईल समोर घेऊन जेवण बंद करायला भाग पाडणं हे शिक्षकांनाच जमू शकेल... हतबल पालक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com