आजही...

सोनाली नवांगुळ
शुक्रवार, 8 मार्च 2019

मी  व्हीलचेअरवर वावरते. संवादाच्या बाबतीत मोकळीढाकळी. तरी एकुणातच कुठल्याही तऱ्हेची अपंग माणसं परिस्थितीनं पिडलेली नि दु:खीबिख्खी असू शकतात, असा बऱ्यापैकी समज आहे. मुलगी असणं नि त्यातून अपंगत्व ही दुहेरी विवंचना (समाजाला) असते. जवळची मैत्रीण एकदा भयंकर चिडून म्हणाली, ‘अगं, तुझ्यासारख्यांच्या स्वतंत्र व स्वावलंबी राहाण्याबद्दल कुतूहल असू शकतं हे मान्यय गं, पण मला विचारलं काय या बायकांनी की तिला पिरियड्‌स होतात का?’ अजूनही बायका तमकीचं लग्न का होत नाही?

मी  व्हीलचेअरवर वावरते. संवादाच्या बाबतीत मोकळीढाकळी. तरी एकुणातच कुठल्याही तऱ्हेची अपंग माणसं परिस्थितीनं पिडलेली नि दु:खीबिख्खी असू शकतात, असा बऱ्यापैकी समज आहे. मुलगी असणं नि त्यातून अपंगत्व ही दुहेरी विवंचना (समाजाला) असते. जवळची मैत्रीण एकदा भयंकर चिडून म्हणाली, ‘अगं, तुझ्यासारख्यांच्या स्वतंत्र व स्वावलंबी राहाण्याबद्दल कुतूहल असू शकतं हे मान्यय गं, पण मला विचारलं काय या बायकांनी की तिला पिरियड्‌स होतात का?’ अजूनही बायका तमकीचं लग्न का होत नाही? मूल होतंय का नि नाही झालं वेळेत तर काही अडचण आहे का, दत्तक घेतलं तर दोघांच्यात प्रॉब्लेम आहे का, नवरा मेला असेल तर ती अमुक तऱ्हेनंच वागायला नको का? घरात कामाला सहकारी असतील तर ती घरात जबाबदारी म्हणून काय करते? पाहुण्यारावळ्यांच्यात तिच्याबद्दल काय प्रवाद आहेत? अक्षरश: ती नखं कुठं काढते असेही विषय का चघळतात? इतकं मोठं जग आज आपल्याला उपलब्ध आहे, तरी या स्वत:चा इतका संकोच का करतात?
संकोच फोडण्याची एक बारीक फट मिळाली तरी बरेचदा जुन्या प्रश्‍नांची कोंडी फुटू शकते. ‘पिरियड : एन्ड ऑफ सेंटेन्स’ या ऑस्कर मिळालेल्या माहितीपटाच्या निमित्तानं आलेल्या बातम्या पाहिल्यावर हे पटलं. बदलाच्या वाहक झालेल्या त्यातल्या दोन मुलींच्या घरी स्वच्छतागृहासारखी मूलभूत सोय पैशाअभावी झालेली नाही. बऱ्याच घरांमध्ये ती सोय नाही नि तात्पुरत्या उभारलेल्या मोबाईल संडासात त्यांना मोकळं व्हावं लागतं. मासिक पाळीत वापरायचे पॅड्‌स बनवण्याचा कारखाना टाकून त्याबद्दलची लाज, गैरसमज यातून मोकळ्या होत स्वावलंबी होणाऱ्या या बायकांना ‘ऑस्कर’ म्हणजे काय हे कळत नाहीये, पण या कामानं त्यांच्यातली एखादी स्नेहा दिल्लीतल्या तिच्या पोलिसी ट्रेनिंगचा खर्च बाहेर काढतेय नि खूष आहे. देशात नि देशाबाहेरच्या परिस्थितीची माहिती घेतली तर कळलं की घरात तीन-चार बायका असतील तर तीनचार कपड्यांच्या घड्या त्या आलटूनपालटून वापरतात. कुणी गाद्यांचे खराब तुकडे, भुसा नि काही वेळा तर दगड वापरतात. काही ठिकाणी अशा दिवसात तिला गावाबाहेरच्या लाइटपाण्याची सोय नसलेल्या झोपडीत किंवा गुरांच्या गोठ्यात कळा दाबत पडून राहावं लागतं. अनेकदा इन्फेक्‍शनच्या आधी ती साप चावून किंवा जंगली जनावराच्या हल्ल्यात मरते. या गोष्टी शुद्धाशुद्धतेशी निगडित केल्यामुळे बाई काय काय सोसते, शिक्षण सुटतं याची चर्चा तर खूपच परिचित. त्यामुळे कुणी ॲथलिटनं ‘आय ब्लीड’ म्हणत पाळीचा स्राव दिसू देणं नि कुणा चित्रकर्तीनं त्या स्रावातून चित्रं काढणं हे जोर करत कोंडी फोडणं असतं.

Web Title: sonali navangul write pahatpawal article in editorial