

Sulakshana Pandit's Musical Roots
Sakal
The Unrequited Love Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सव्यसाची अभिनेता आणि अभिनय व पार्श्वगायनात चमकणारी सुस्वरूप अभिनेत्री. ती अभिनेत्री त्या अभिनेत्यावर जिवापाड प्रेम करीत होती. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. ती त्याला एका मंदिरात घेऊन गेली. ती उत्तर भारतातील असल्याने त्याला म्हणाली, ‘‘माझ्या भांगात कुंकू घालून माझा पत्नी म्हणून स्वीकार कर.’’ त्याने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. पुढे अल्पकाळातच त्या अभिनेत्याचे आकस्मिक निधन झाले. त्या अभिनेत्रीला हा मानसिक धक्का होता. त्या धक्क्यातून ती कधी सावरलीच नाही! आणि ती आयुष्यभर अविवाहितच राहिली.