‘ती’चे क्षितिज : काहीच न करण्याची कला

स्त्रीच्या ‘निवांत वेळे’कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, सतत काहीतरी करत राहण्याच्या सवयीमागची मानसिकता आणि स्वतःसाठी शांत क्षण राखून ठेवण्याच्या नव्या जाणीवेचा वेध
The Art of Doing Nothing: Why Women Deserve Their Own Space

The Art of Doing Nothing: Why Women Deserve Their Own Space

Sakal

Updated on

अ‍ॅड. अभिधा निफाडे

साधारणतः संध्याकाळी सहा-साडेसहाची वेळ, उन्हाचा दाह कमी झालेला, शेतातून माणसं परतलेली आणि बायकांची स्वयंपाकाची गडबड असा काहीसा माहोल मला आठवतो. लहानपणी मी सुट्टीला गावाकडे जायचे तेव्हा मित्रांबरोबर पारावर तासनतास गप्पा मारत बसलेल्या माझ्या आजोबांना जेवायला बोलवायची जबाबदारी हमखास मला मिळत असे. ‘आबा, जेवायला चला’, असे म्हणून मी पारावरच्या त्या रंगलेल्या गप्पांची तंद्री भंगवायचे काम करीत असे. असेच एकदा आजोबांबरोबर रात्री घराकडे चालत येत असताना, ‘आबा, तुम्ही आजीलापण का नाही नेत हो पारावर गप्पा मारायला?’, असं मी त्यांना विचारलं तर ते खो-खो हसतच सुटले. आजी, पारावरचे मित्र, येणारे-जाणारे सगळ्यांना हा प्रसंग ते सांगत आणि तेही सगळे हसत. यात हसण्यासारखं काय हा प्रश्न तेव्हा मला पडला आणि आता थोडी मोठी झाल्यावर त्याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात कळू लागलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com