dollar and rupees
sakal
- डॉ. किशोर कुलकर्णी
भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार करारातील अनिश्चितता, आयातदारांकडून डॉलरला असलेली मोठी मागणी यामुळे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. रुपयाची नव्वदच्या पुढे घसरगुंडी होण्याची कारणे आणि त्यांच्या परिणामांचा वेध.
आठ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता भारतीय रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ९०.१७ रुपये होते. याची तुलना १९७५ मध्ये प्रतिडॉलर १० रुपये आणि गेल्या वर्षी ८४ रुपयांशी करण्यात आली. हे चांगले की वाईट? हे तुम्ही कोणाला विचारता यावर अवलंबून आहे.