
विद्याधर पुरंदरे
देशातील उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीत आपल्या राज्याचा महत्त्वाचा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञान व्यवसायांचा विचार करता आपल्या राज्याची क्षमता मोठी आहे. परंतु त्यासाठी धोरणे, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पातळीवर आणखी सुलभता आवश्यक आहे. महाराष्ट्र व पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र व सरकार यांच्यातील समन्वयातून या क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास निश्चित साधता येईल.