श्रद्धांजली 'पाणीदार' माणूस

राजकुमार भितकर
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोणतेही सरकारी अनुदान न घेता विदर्भ व मराठवाड्यातील 50 हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याची किमया ज्यांनी साधली, त्या "दिलासा'चे संस्थापक मधुकर धस यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक "पाणीदार' माणूस गमावल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.
धस मूळचे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील. कळंब तालुक्‍यातील भोगची हे त्यांचे मूळ गाव. गरीब कुटुंबातील मधुकरराव पदव्युत्तर शिक्षणानंतर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आले.

येथे काही काळ त्यांनी "जाणीव' या संघटनेत काम केले. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी तेथेच "दिलासा'ची सुरवात केली. या संघटनेच्या माध्यमातून अल्पावधीतच विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे 75 हजार शेतकऱ्यांपर्यंत ते पोचले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांनी शेती व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी पुसदमध्ये "हसरे घरकुल' सुरू केले. महिला सक्षमीकरणाअंतर्गत सात हजार महिला बचत गटांची निर्मिती त्यांनी केली. घाटंजीपासून सुरू झालेल्या "दिलासा'चे कार्य आज विस्तारले आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व मराठवाड्यातील नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना "दिलासा'ने मदतीचा हात दिला आहे. पैसे नसल्यामुळे पत्नीचे शव कित्येक मैल खांद्यावर वाहून नेणाऱ्या दाना मांझीची बातमी वाचून ते फार व्यथित झाले. त्यांनी लगेच संस्थेच्या एक व्यक्तीस 50 हजार रुपये घेऊन मदत पाठविली. त्यांच्या दातृत्वाचे अशी अनेक उदाहरणे आहेत.

पाण्याची टंचाई हेच शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत समजून त्यावर त्यांनी संशोधन केले. त्यामध्ये फड सिंचन योजना, डोह सिंचन योजना कार्यान्वित करून शेकडो एकर शेती विजेविना ओलित करून दाखविली. याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना मिळाला. फड सिंचनाची कामे विदर्भातील 50 ते 60 गावांत, तर डोह मॉडेलचे काम विदर्भ व मराठवाड्यातील सातशे गावांत झाली आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून टाटा ट्रस्ट, ऍक्‍सिस बॅंक, आयटीसी लिमिटेड, केअरिंग इंडिया, नाबार्ड, एफसीआरए आदी संस्थांनी कोट्यवधी रुपयांची देणगी "दिलासा'ला दिली. आजही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन योजनेंतर्गत शेकडो कामे सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशनसह 20 संस्थांशी ते संलग्न होते. शासनाने त्यांची शासकीय समितीवर निवड केली.

Web Title: tribute to madhukar dhas