

Emotional Safety Valves: Understanding the Role of Sports and Soap Operas in Human Society
Sakal
अॅड. अभिधा निफाडे
माझी आजी जाऊन परवा पाच वर्षे झाली. आजी खरंतर माझी मैत्रीण होती, असं म्हणायला हरकत नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी आजोळी गेले, की आम्ही दोघी भरपूर भटकायचो, बाजारात जाऊन भाज्या आणायचो-निवडायचो आणि रात्री मस्तपैकी टीव्हीवरच्या मालिका पाहायचो. त्यावर आमच्या गंभीर चर्चाही रंगायच्या. आमच्या या चर्चा आजोबांना मात्र फार कंटाळवाण्या वाटायच्या. बातम्या आणि क्रिकेट यांशिवाय फारशा गोष्टींमध्ये रस नसलेले आजोबा मग आमच्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे फिरायला निघून जायचे.