
अभिषेक शेलार
अमेरिकेने भारतीय निर्यातीवरील आयातशुल्क ५०टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने देशातील सर्वच राज्यांवर परिणाम होणार आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, कापूस, ऊस, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योग यांवर आधारित आहे. या क्षेत्रांपैकी अनेकांचे उत्पादन थेट किंवा अप्रत्यक्षपणे निर्यातीवर अवलंबून आहे.