

Vande Mataram' A Mantra of National Transformation
Sakal
मिलिंद सबनीस
‘मा ते तुला वंदन असो.’ असा साधा-सरळ अर्थ असलेले हे शब्द. इंग्रजांना त्याचे एवढे भय का वाटावे? हिमालयाची उत्तुंगता, गंगेची निर्मलता अशा उपमा ज्या गीताला लागू पडतील असे हे गीत! एरवी अत्यंत सरल शब्द असलेल्या आणि तरल भावना असलेल्या या गीतांच्या श्रीकृष्णाच्या वेणूनादासारख्या शब्दांनी इंद्राच्या वज्राचे, हनुमानाच्या गदेचे, अर्जुनाच्या धनुष्याचे, श्रीविष्णूंच्या सुदर्शनचक्राचे, अष्टभुजा दुर्गेच्या हातातील शत्रुसंहारक अस्त्रांचे रूप धारण केले. राष्ट्राच्या जडणघडणीत अनेक व्यक्तींच्या संघटनांच्या कर्तृत्वाचे, कामगिरीचे मोठे योगदान असते. परंतु एका गीताने किंबहुना त्यातील केवळ दोन शब्दांनी राष्ट्राच्या इतिहासाला वळण देण्याचे उदाहरण अपवादात्मकच आहे.