हे खरं की ते?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

तालुक्‍याचे ठिकाण असल्यासारख्या नगरात एक प्राणिसंग्रहालय होते. वाघ, वानर, कोल्हा, मोर, ससे, अस्वल असे विविध प्राणी त्यात होते. नगरातील लोकांना त्या प्राणिसंग्रहालयाचे कौतुक वाटे. 

प्राणिसंग्रहालयाची संचालन समिती तेथील प्रतिष्ठित लोकांची बनलेली होती. तेथील स्वच्छता, व्यवस्था इत्यादीचे ते लोक व्यवस्थित भान ठेवत. त्यामुळेच ते प्राणिसंग्रहालय सर्वांचे आकर्षण केंद्र बनले होते. बाहेरगावातून अन्य कामांसाठी येणारे प्रवासी, मित्रमंडळी आवर्जून हे केंद्र पाहायला येत. बाहेरून येणाऱ्या नातेवाइकांना लोक आग्रहाने प्राणिसंग्रहालय पाहायला घेऊन जात.

 एकदा प्राणिसंग्रहालयाची संचालन समिती विचारविनिमयासाठी बसलेली असताना एकाने विषय काढला, ‘‘आपल्या प्राणिसंग्रहालयात हत्ती असला पाहिजे, तेवढी एक कमतरता आहे.’’ चर्चा सुरू झाली. ‘हत्ती कोठून आणावा...खरेदी करायचा असल्यास केवढ्याला पडेल...त्याला चारा किती लागतो...मग त्या चाऱ्याचा महिन्याचा खर्च किती येईल वगैरे...’ जसजशी चर्चा रंगत गेली, तसतशी एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली की हे प्रकरण आपल्या खिशाला परवडण्यासारखे नाही.  पण, हत्ती असला पाहिजे. हत्ती म्हणजे गजेंद्र, हत्ती म्हणजे श्री गणेश, हत्तीशिवाय पूर्णता नाही. काय वाटेल ते करा, पण हत्ती आणाच...

आता दोन तट पडले. शेवटी एकाने एक शक्कल सुचवली, ‘‘हत्ती नको. हत्तीच्या हुबेहूब आकाराचा जाडा काळ्या रबरचा फुगा-बलून हवा भरून ठेवूया. मोठे कंपाउंड करू. आत कुरण तयार करू. लोकांना दुरून पाहू देत. कुणाला कळणार नाही. हत्तीपण येईल. फारसा खर्च होणार नाही. जमतंय मग.’’

हळूहळू सगळे सहमत झाले. कुरण तयार झाले. कुंपण लागले. हत्ती आला. बातमी पसरली. लोकांची गर्दी हत्ती पाहायला लोटली. सर्व खूश झाले...संचालन समिती धन्य झाली. त्यांना शाबासकीची थाप मिळाली. एक दिवस सकाळी आपल्या वर्गाची सहल घेऊन एक वर्गशिक्षिका आल्या. प्रत्येक पिंजऱ्यासमोर उभ्या राहून त्या संबंधित प्राण्याचे वर्णन करू लागल्या. ‘‘हे माकड आहे. ते उड्या मारते. मनुष्याची नक्कल करते. हा वाघ. शिकार करतो. झाडावर चढू शकतो. आणि हा हत्ती! हा अत्यंत वजनदार प्राणी आहे. जुन्या काळी शिक्षा म्हणून हत्तीच्या पायदळी द्यायचे. हा चालू लागला की जमीन हादरते वगैरे.’’

हे वर्णन सुरू असतानाच वाऱ्याची झुळूक आली आणि हत्तीचे चारही पाय अधांतरी झाले. जसा वाऱ्याचा झोत दिशा बदलू लागला, तसा हत्तीही हालत, डोलत दिशा बदलू लागला. मुलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. डोळ्यांसमोर दिसतोय...तो खरा हत्ती, की शिक्षिका वर्णन करताहेत...तो खरा हत्ती?

आपला समाज कधी कधी असाच संभ्रम निर्माण करतो. देवभीरू, पापभीरू, स्वर्ग-नरकाबद्दल आस्था बाळगणारा, कणाकणांत ईश्‍वर पाहणारा समाज- जातिभेद पाळतो. वृद्धाश्रम उघडतो. लाचलुचपत करतो आणि ढेकर देतो. हत्ती नसला तरी चालेल, पण बलूनचा हत्ती नको, असे वाटते.

Web Title: vinay patrale article

टॅग्स