कालातीत सुवर्णमहिमा

भारतीयांनी आजवर केलेल्या एकूण बचतीत तेरा टक्क्यांहून अधिक बचत सोन्यात केली आहे. सोने उत्पादनात भारत ६०व्या क्रमांकावर आहे. भारतात फक्त चार टन सोन्याचे उत्पादन होते.
vinayak kulkarni writes history of gold production india rank 6th
vinayak kulkarni writes history of gold production india rank 6thSakal

- विनायक कुळकर्णी

आज भारतीयांकडील सोने किमान पंचवीस हजार टन असून त्याची आजची बाजारभावाने किंमत ८०० बिलियन डॉलर्स म्हणजेच ६,४०,००० कोटी रुपयांहून अधिक होते. २०२०च्या एका अहवालानुसार भारतीय स्त्रियांकडे २१,७३३ टन सोने दागदागिन्यांच्या-अलंकारांच्या स्वरूपात असून या व्यक्तिगत खासगी सुवर्णसाठ्याचे मूल्य भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३७ ते ४० टक्के होते.

भारतीयांनी आजवर केलेल्या एकूण बचतीत तेरा टक्क्यांहून अधिक बचत सोन्यात केली आहे. सोने उत्पादनात भारत ६०व्या क्रमांकावर आहे. भारतात फक्त चार टन सोन्याचे उत्पादन होते. भारतातील एकूण सोन्याच्या उत्पादनांपैकी ८० टक्के उत्पादन कर्नाटकातील कोलारमध्ये होते. आजवर १,७१,३०० टन सोने जगभरातील खाणींतून काढले आहे. या खाणींतून निर्माण केलेल्या सोन्यापैकी साठ टक्के सोने फक्त अलंकार-दागदागिने घडविण्यासाठी वापरण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांत सरासरी ३,८०० टन सोन्याची मागणी आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणी आणि पुरवठ्यात मोठा फरक पडत आहे. सोन्याच्या जुन्या अलंकारांच्या मोडतोडीतून ६०० टन तर विविध देशांच्या केंद्रीय बँकांच्या राखीव सोन्याच्या विक्रीतून सुमारे ८०० टन सोने मागणी आणि पुरवठ्यातील फरक भरून काढीत असतो.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३.४ ट्रिलियन रुपये किमतीचे सोने भारताने आयात केले होते. भारताचा राखीव सुवर्णसाठा मार्च २०२३ मध्ये ७९४.६४ मेट्रिक टन होता. मागील पाच वर्षांत भारताचा हा साठा चाळीस टक्क्यांनी वाढला आहे.

भारताच्या परदेशी चलनाच्या राखीव साठ्याच्या ७.८१ टक्के हा सुवर्णसाठा आहे. भारताच्या राखीव सुवर्णसाठ्यापैकी बँक ऑफ इंग्लंडच्या सुरक्षित जमा कक्षात ४३७.२२ टन तर बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे ३०१.१० टन ठेवण्यात आलेले आहे.

देश स्वतंत्र झाल्यापासून प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत ८८ रुपयांवरून आता नोव्हेंबर २०२३ मध्ये ६१ हजार रुपयांच्या सीमेवर उभी आहे. साहजिकच आहे, सर्वसामान्य व्यक्तीला गेल्या ७५ वर्षांत सहाशे ऐंशी पटीने सोन्याच्या किमतीत झालेली वाढ गुंतवणुकीसाठी उद्द्युक्त करते. मार्च २००६ मध्ये आलेल्या गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड युनिट्स (Gold ETF Units) मात्र आता लोकप्रिय झाले आहेत.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना सोने प्रत्यक्ष धातू रूपात किंवा अलंकारांच्या स्वरूपात न घेता डीमॅट खात्यात घेता येते. या सोन्याची शुद्धता ९९ टक्के इतकी असते.

या शुद्धतेचा दर्जा प्रमाणित असल्याने गुंतवणूकदार निर्धास्त असतो. एक ग्रॅम सोन्याचे एक गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडचे एक युनिट या परिमाणाने डीमॅट खात्यात व्यवहार केले जातात. भारतीयांची सोन्याची आसक्ती एवढी आहे की, दरवर्षी सरासरी ८०० ते ९०० टन सोने आयात केले जात आहे.

या आयातीत सोन्यापैकी सुमारे ७०-७५ टक्के सोने दागिन्यांसाठीच वापरण्यात येते. उर्वरित २० ते २५ टक्के सोने धातू स्वरूपातील सोन्याच्या बचतीकडे वळते. भारतात फक्त चार टन सोन्याचे उत्पादन होते. जगातील धातू किंवा अलंकार स्वरूपातील एकूण सोन्यापैकी भारतीयांकडे किमान अकरा टक्के सोने आहेच.

आज भारतीयांकडील सोने किमान पंचवीस हजार टन असून त्याची आजची बाजारभावाने किंमत ८०० बिलियन डॉलर्स म्हणजेच ६,४०,००० कोटी रुपयांहून अधिक होते. २०२०च्या एका अहवालानुसार भारतीय स्त्रियांकडे २१,७३३ टन सोने दागदागिन्यांच्या-अलंकारांच्या स्वरूपात असून या व्यक्तिगत खासगी सुवर्णसाठ्याचे मूल्य भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३७ ते ४० टक्के होते.

भारतीयांनी आजवर केलेल्या एकूण बचतीत तेरा टक्क्यांहून अधिक बचत सोन्यात केलेली आहे. भारतात सर्वात अधिक सोन्याची खरेदी ग्रामीण भागात होते. मध्यमवर्गीय सोन्याचा प्राथमिक ग्राहक म्हणून गणला जातो. सप्टेंबर १९९९ मध्ये सरकारने सुवर्ण ठेव योजना आणली होती. नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली.

गोल्ड ईटीएफ युनिट्स किंवा ई-गोल्ड युनिट्सची डीमॅट स्वरूपात खरेदी आणि विक्री करताना आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दराशी निगडित असणारे मूल्यांकन गुंतवणूकदाराच्या फायद्याचे ठरू शकते. सरकारने धार्मिक देवस्थाने आणि भारतीयांकडील घराघरांत आणि बँक लॉकर्समध्ये पडलेले सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी सुवर्ण चलनीकरण योजना सुरू केल्या.

जागतिक उदारीकरणानंतर आर्थिक क्षेत्रात सोन्याकडे गुंतवणुकीचे एक माध्यम म्हणूनच बघितले जाऊ लागले. अॅम्फीच्या संकेत स्थळावरील महितीनुसार मागील आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये गोल्ड ईटीएफ युनिट्समध्ये ६५३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर २०२१-२०२२ या आर्थिक वर्षी ही गुंतवणूक २५०० कोटी रुपयांहून अधिक होती.

२०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीत सुमारे ७४ टक्के घसरण झाली असली तरीही गुंतवणूकदारांच्या फोलिओंच्या संख्येत मात्र वाढ होऊन ४७.२८ लाखांवर गेले आहेत.

मागील ७५ वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली ६८० पट वाढ आकर्षक वाटली तरी यापेक्षा जास्त पटीने सोन्याच्या दरात वाढ भविष्यात अपेक्षित आहे. आपल्या संपत्तीच्या केवळ दहा टक्क्यांपर्यंतचा हिस्सा सोन्यासाठी राखून ठेवला तर आपल्या संपत्तीचे मोल वाढणार आहे, हे निश्चित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com