देह-संदेह : अनुभवावीण मान हालवू नको रे...

माध्यमांच्या पडद्यापलीकडचा देहानुभव: प्रतिमा, तर्क आणि प्रत्यक्ष यांच्यातील संघर्षाची उकल
The Paradox of Media Influence: Doubting Direct Experience

The Paradox of Media Influence: Doubting Direct Experience

Sakal

Updated on

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

बऱ्याच वर्षांपूर्वी माध्यमांसंबंधीच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक व्यंगचित्र पाहिले होते. पुस्तकाचे नाव आता आठवत नाही. पण ते व्यंगचित्र इतके मार्मिक होते की, अजूनही लक्षात आहे. त्यातला छोटा मुलगा घरी टीव्ही पाहात सोफ्यावर बसलेला असतो. खिडकीतून दिसतेय की, बाहेर पाऊस पडतोय. तरी तो छोटा मुलगा आईला विचारतो, “आई बाहेर खरंच पाऊस पडतोय का गं? कारण टीव्हीवरच्या बातम्यांत तर तसे काही दिसत नाहीयं.” वरकरणी साध्या वाटणाऱ्या या व्यंगचित्रामध्ये एका खोलवरच्या तणावावरचे सुंदर भाष्य आहे. थोड्या तात्त्विक शब्दांत सांगायचे तर एखादी गोष्ट खरी खोटी ठरवायची असेल तर कशाला प्रमाण (किंवा वैध) मानायचे यातील हा तणाव आहे. त्या मुलाला बाहेर पाऊस पडताना दिसतोय. कदाचित पावसाचा आवाजही ऐकू येत असेल. त्या अर्थाने ‘पाऊस पडतोय’ हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याने त्यावर विश्वास ठेवायला हरकत नव्हती. पण प्रमाण म्हणून माध्यमांची व्यवस्थात्मक ताकद त्याने इतकी मनोमन स्वीकारलीय की, जे प्रत्यक्ष अनुभवतोय त्यावरही त्याला शंका वाटतेय. खऱ्याखोट्याबाबत निर्णय करताना त्याला प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट वाटतेय. प्रमाणाबद्दल त्याचा गोंधळ उडालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com